राजकारण

Shalini Thackeray : राज ठाकरे यांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सण-उत्सवांमधल्या मिरवणुकांवेळी डीजे, डॉल्बीच्या आवाजावर भाष्य केलं होते

Published by : Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सण-उत्सवांमधल्या मिरवणुकांवेळी डीजे, डॉल्बीच्या आवाजावर भाष्य केलं होते की, उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे,डॉल्बी ह्यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. ह्यात मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४,२४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ? असे म्हटले होते.

यावरुन सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की, एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय म्हणून हा बडा नेता भाष्य करेल. नेत्यांच्या नातवाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मात्र गोर गरिबाचं मुलही चांगलं राहिलं पाहिजे. नुसतं दुपारी उठून कसं चालेल. असे अंधारे म्हणाल्या होत्या.

यावर आता शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारे यांना थेट इशारा दिला आहे. अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news