राजकारण

पक्षाने आदेश दिल्यास आपण गमिनी काव्याने बेळगावात घुसू अन्...: शहाजी बापू पाटील

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे. यावर शहाजी बापू पाटील यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादावर बोलताना आव्हान दिले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिजीत उबळे | पंढरपूर : महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे शिंदे गटानं मात्र एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पक्षाने आदेश दिल्यास बेळगावात गमिनी काव्याने घुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करू, कर्नाटक सरकारला थेट प्रतिआव्हान दिले आहे.

कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही आहे. जत तालुक्यात पाणी सोडल्यानंतर बोम्मई यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येवू नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी आपण बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

तर, शहाजी बापू पाटील यांनीही पक्षाने आदेश दिल्यास बेळगावात गमिनी काव्याने घुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करू, असा सूचक इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे. सांगोल्यात आज दिव्यांग दिनाच्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादावर बोलताना आव्हान दिले आहे. तसेच दोन महिन्यात दिव्यांगांसाठी पतसंस्था उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, सांगली- कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा 8 दिवसांचा अल्टिमेटम आज संपणार आहे. रविवारी संध्याकाळी जतच्या उमदी या ठिकाणी पाणी संघर्ष कृती समितीची व्यापक बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशारा देण्यात आला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची ही बोंबाबोंब कधी थांबणार आहे. आणि महाराष्ट्र सरकार याला कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Economist Bibek Debroy passed away: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात; म्हणाले...

'फडणवीसन यांच्या बाजूने असलेल्या लोकांना 'त्या' मदत करतात' राऊतांचा कोणावर निशाणा?

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त