महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट पडले. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील 9 आमदारांनी शपथ घेतली.
यातच आता शरद पवारांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. नागालँडच्या राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग यांनी दिल्लीत येऊन प्रफुल्ल पटेल यांची आणि महाराष्ट्रात येऊन सुनील तटकरेंची भेट घेतली. त्यानंतर या निर्णयाची माहिती देण्यात आली.
नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी एक पत्रक जारी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागालँडने हा निर्णय घेतला आहे. हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना पाठिंबा देतील. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करु. असे या पत्रकात म्हटले आहे.