आदेश वाकळे | संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. सत्यजीत तांबे आणि वडील सुधीर तांबे यांचे कॉंग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर आता सत्यजीत तांबे हे प्रसारमाध्यमांसमोर यायला तयार नाही. तसेच, त्यांचे मामा आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे हे भाजपात प्रवेश करतात की काय, असा सवाल उभा राहिला आहे.
सत्यजीत तांबेना राजकारणात प्रवेश करून जवळपास 15 वर्ष झाली. युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदही गेले. मात्र, सत्यजीत तांबे यांना संधी मिळेना. सत्यजित तांबे यांचे संघटन राज्यात मजबूत आहे. हायकमांड म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या राहुल गांधी यांच्याशीही त्यांची चांगलीच जवळीक होती. मात्र, भारत जोडो यात्रेपासून सत्यजीत तांबे यांना बाजूला ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे. हे मामा बाळासाहेब थोरात हे सर्व जवळून पाहात होते. तरीही त्यांना वारंवार डावलण्यात येत होते. आता योग्य वेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेल, असे सत्यजीत तांबे सांगत आहेत. यामुळे समझदार को इशारा काफी है एवढं मात्र नक्कीच.
दरम्यान, सत्यजित तांबे यांनी आपल्या सोशल मीडियावर प्रोफाईलवरुन कॉंग्रेसचे नाव हटवले आहे. तसेच, निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.