सातारा; किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.
याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे. लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर सूडबुद्धीने पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने साताऱ्यात पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आलाय. महाराष्ट्राला किरीट सोमैय्या माहिती नव्हता मात्र लोकशाहीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला किरीट सोमैया समजला. गुन्हा दाखल करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम किरीट सोमैया यांनी केलं असल्याचे सांगत जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी निषेध व्यक्त केलाय.