सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यानंतर त्यांना भारतीय महिलांनी 'सरदार' ही उपाधी दिली. तसेच वल्लभभाई पटेल वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. त्यानंतर भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
राहुल गांधी सोशल मिडिया वर ट्विट मध्ये बोलत होते "आज आपल्या लोकतंत्राचे सर्व स्तंभ कमजोर केले जात आहे. आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या विचारांची आठवण करणे गरजेचे आहे. या स्तंभाच्या निर्माण करण्यामागे कॉंग्रेस मधल्या नेत्यांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान होते" अस कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केल आहे