राजकारण

सपना चौधरीचे परळीत ठुमके; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर सर्वच स्तरातून टीका

Published by : Lokshahi News

प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीने पुन्हा परळी मध्ये ठुमके लगावल्यानं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सर्वच सरावरून टीका होऊ लागलीय. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप, यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित असताना एका मंत्र्यांना हे कितपत योग्य वाटतं? असा सवाल उपस्थित होतो आहे.

परळी शहरातील हलगे गार्डनमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने दिवाळीचं औचित्य साधून स्नेहमिलन आणि फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भाषणात धनंजय मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला, त्यांच्या भाषणाचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीचे ठुमके परळीकरांनी पाहिले. मात्र, सपना चौधरीच्या डांस नंतर सर्वच स्तरावरून धनंजय मुंडेंवर टीका होऊ लागलीय. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना पालक मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम होत असल्याचं शेतकरी कामगार पक्षाच्याकडून बोलले जात आहे.

दुसरीकडे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे आणि भाजपकडूनदेखील धनंजय मुंडेंवर टीका करण्यात आलीय. सामाजिक न्याय विभागाचं भान न्याय मंत्र्यांनी राखलं पाहिजे, धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते असताना त्यांना सामाजिक भान होतं. मात्र आता त्यांचं सामाजिक भान हरवले असल्याची टीका आमदार मेटे यांनी केली. 2018 मध्ये देखील नाथ फेस्टिवल कार्यक्रमात सपना चौधरीच्या "तेरी अखियो का ये काजल" गाण्यानंतर धनंजय मुंडेंवर टीका झाली होती. सध्या कोरोनाचं सावट कायम आहे. असे असताना सर्वसामान्यांना सरकारकडून निर्बंध पाळण्याचं आवाहन केले जाते. मात्र या परिस्थितीत त्यांचेच मंत्री असं वागत असतील तर महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांना आपल्या जबाबदारीचे भान राहिलं नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय