संजय शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले होते की, 'प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होतं. ते असे म्हणाले होती की, ‘आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली
यावर उत्तर देत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, संजय शिरसाट यांचे महिलांबाबतचे विचार यातून दिसून येतात. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.
यावर प्रतिउत्तर देत संजय शिरसाट म्हणाले की, प्रियंका चतुर्वेदी यांनी चारित्र्यहीनतेच्या गप्पा मारू नये. आम्ही चारित्र्य काढायला लागलो तर बात दूर तक जायेगी. प्रियंका यांच्याबद्दल मी काहीच बोललो नाही. चंद्रकांत खैरे काय बोलले होते हे मी स्पष्ट केलंय. तसेच प्रियंका चतुर्वेदी जिकडे जाल तिकडे भारी असतात. एका तासात फॉर्म भरून राज्यसभेच्या खासदार होतात. चतुर्वेदींऐवजी खासदारकी मुंबईच्या महिला नेत्यांना दिली असती तर चांगले झाले असते. असे शिरसाट म्हणाले.