मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दौरा रद्द झाल्याने यह डर अच्छा है, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र डागले होते. या टीकेचा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत हा आदित्यला चावला की काय अशी परिस्थिती, असा जोरदार टोला संजय शिरसाटांनी लगावला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केला.
उबाठा गटाचे बेताल वक्तव्य येत आहेत. संजय राऊत हा आदित्यला चवला की काय अशी परिस्थिती आहे. संजयचा गळा आदित्यला आलाय का, असा खोचक सवालही संजय शिरसाटांनी उपस्थित केला आहे. बालबुद्धी हे बरोबर बोलले. बाळासाहेबांचा अंश तुमच्यात असता तर महाराष्ट्राला दिशा दिली असती. ट्विटमुळे दौरा रद्द या विचारात राहू नका, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, दसरा मेळाव्यावरुन पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यत आहे. यावर ते म्हणाले, आमचा आग्रह शिवसेना प्रमुखांचा विचार पोहचवायचा. आम्हाला मैदान मिळावं नाही तर शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील. संजय राऊतला मिलिटरी काय गरज दोन पोलिसवाल्यांना पाहून हा पळून जाईल. संजय राऊत यांनी गिरणी कामगाराना देशोधडीला लावले. एकही मराठी माणसाचे यांनी काम केले हे ऐकण्यात नाही. संजय राऊतला संघटनेची माहिती नाही. आघाडीतील नेते हे जोडे घेऊन उभे राहतील आणि विचारतील कुठं आहे संजय राऊत, अशी खिल्ली शिरसाटांनी उडवली आहे.
दरम्यान, जनेतच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंची चर्चा सध्या रंगली आहे. यावरही संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांना शुभेच्छा. 144 आकडा क्रॉस होतो त्यांचा मुख्यमंत्री बनतो, त्यांचे ही आमदार निवडून यावेत. भाजपला वाटते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, राष्ट्रवादीला अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत आणि आमचे मुख्यमंत्री कायम राहावेत. माझ्या मनातले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, असे त्यांनी म्हंटले आहे.