राजकारण

Sanjay Raut: वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन संजय राऊतांचा मोठा आरोप

सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण साधं नाही.

Published by : Dhanshree Shintre

सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण साधं नाही, जसं पुणे प्रकरणात अग्रवाल फॅमिली आहे, तशीच इथे मेहता फॅमिली आहे, मुलाचा जो बाप आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासा. पोलिसांकडे तो नसेल तर आम्ही देऊ. कोणत्या अंडरवर्ल्ड यांची संबंध आहेत, तो काय करतो, त्याची प्रॉपर्टी किती आहे, एवढ्या मोठ्या गाड्या कुठून येतात याचा तपास मुंबई पोलिसांना करावा लागेल.

हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला, ज्याचा संबंध अंडरवर्ल्ड गॅंगशी आहे. बोरीवली पोलीस ठाण्यात जाऊन त्याचा रेकॉर्ड तपासा. मी मुंबई पोलीस आयुक्तांना आव्हान करतो त्याचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदे सोबत कोणत्या प्रकारची लोक बसली आहेत हे कळेल यासाठी हा जो आरोपी आहे जो ड्रक्सच्या नशेत होता आणि ही नशा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी तीन दिवसांसाठी त्याला फरार केलं होतं आणि नंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांवरती देखील संशय येऊ शकतो केलेला प्रकार अत्यंत अमानुष आहे. त्यामुळे असा व्यक्ती कारागृहातून सुटू नये जर कोणी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करेल तर रस्त्यावर उतरून लोकांनी पोलिसांना याचं उत्तर मागायला हवं. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून केला जात आहे, कारण मुलाचा जो बाप आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नेता आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश