मुंबई : संजय राऊत यांना खासदार करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या सांगण्यावरुन मी पैसा खर्च केला होता. संजय राऊत खासदार होणं, हे माझं पाप आहे, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या विधानाबाबत विचारले असता संजय राऊत यांनी थेट शिवीचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, नारायण राण्यावर काय बोलायचं तो चुतीया आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. यावर आता नारायण राणे काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
संजय राऊत खासदार झाले, हे माझं पाप आहे. एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावलं. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा तिकडे संजय राऊत होते. बाळासाहेबांनी मला सांगितले की, या संजय राऊतला आपल्याला खासदार करायचे आहे. मी बाळासाहेबांचा कोणताही शब्द खाली पडून देत नसे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी संजय राऊत यांना खासदारकीच्या निवडणुकीसाठी लागणारा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात बोलावलं. बाजूला 'शिवालय'मध्ये उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्याविरोधात दुसरा उमेदवार आणून बसवला होता. पण मला बाळासाहेबांनी संजय राऊतांचं नाव सांगितलं होतं. राऊतांना खासदार करण्यासाठी पैसा खर्च मी केला. हे माझे उपकार असूनही संजय राऊत आज माझ्यावर टीका करतात. आता त्यांची बाहेर राहण्याची पात्रता नाही, आता संजय राऊत तुरुंगातच गेले पाहिजे, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.