राजकारण

उदयनराजे यांचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू : संजय राऊत

किल्ले प्रतापगड येथे आज शिवप्रताप दिन साजरा होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : किल्ले प्रतापगड येथे आज शिवप्रताप दिन साजरा होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भागत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना कडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या दिवशी जल्लोष महाराष्ट्रात नेहमी होतो. परंतु, शिवप्रताप दिनाचे महत्व समजून घ्या. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठविण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचे महत्व हे अधिक वाढणार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजकारणात आहेत. आणि मुख्यमंत्री तोंड शिवून बसलेले आहेत. तिकडे भाजपचे राजकीय प्रवक्ते सुध्दांशू त्रिवेदी यांनी शिवरायांचा अपमान करुन त्यांच्या पदावर बसले आहेत. आणि तुम्ही त्यांचे समर्थन करतात. अशा मुख्यमंत्र्यांना कडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का? असा विचार या राज्याची जनता करतीये.

उदयनराजे भोसले छत्रपतींचे वंशज आहेत. उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक मनामध्ये ही भावना आहे. शिवरायांचा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का नाही येत. ही त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली आहे. पण, मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार एका हतबलतेने शिवरायांचा अपमान पाहत आहे. आणि परत शिवप्रताप दिन साजरा करत आहेत. हे ढोंग आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. आणि आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत, अशा सवालही त्यांनी विचारला आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result