नुकताच गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. मात्र, आता पुन्हा एकदा संजय राऊत यांचे टेन्शन वाढले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषणाप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना 1 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राऊत कोर्टात हजर न राहिल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
माहितीनुसार, 30 मार्च 2018 रोजी बेळगावात संजय राऊत यांनी भाषण केलं होते. मात्र, राऊतांच्या त्याच भाषणात त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. हा प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका बेळगावातील स्थानिक पोलिसांनीच ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, आता या समन्समुळे शिवसेना ठाकरे गटाच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. या प्रकरणात आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.