मुंबई : बंडखोर आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू, या आशयाचे भाषण रविवार शिवसेनेचे संजय राऊत यांनी केल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल झाले होते. यावर दहिसरच्या भाषणाचे चुकीचे अर्थ काढल्याचे म्हणत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, दहिसरच्या भाषणाचे चुकीचे अर्थ काढले. त्यांचा आत्मा मेला आहे. आता फक्त शरीर उरले आहे, असे मी म्हणालो होतो. आणि हे खरे असल्याने यात मनाला लावण्यासारखे काहीच नाही. मी कोणाच्याही भावना दुखावल्या नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पक्षात खातात, पितात, मोठे होतात आणि बाप बदलतातात हे गुलाबाराव पाटील यांनीच म्हंटले आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओही ट्विट केला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
नितीन राऊत हेही शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला धक्का समजला जात होता. यावर ते म्हणाले, नितीन राऊत गेले हा धक्का नाही. कारण तिथे बसलेला प्रत्येक व्यक्ती जवळचा आहेत. एकनाथ शिंदे आजही आमच्या जवळचे आहेच. अजूनही आमची अपेक्षा आहे ते परत येतील. त्यांचा आत्मा पुन्हा जिवंत होईल, असे म्हणत पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना साद घालण्याचा प्रयत्न राऊतांनी केला आहे.
बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे यांनी सर्वांना ममतेने सांभाळले आहे. अडीच वर्षाची परिस्थिती, उध्दव ठाकरेंचे आजारपण याचा फायदा घेऊन तुम्ही गेले आहेत. तर ते अमानुष आहे. तुम्हाला मते ईडी मिळवून देणार नाही तर जनता देते, असेही त्यांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून दाऊदशी संबंध असणाऱ्यांचा शिवसेना समर्थन कसे करु शकते, असा सवाल त्यांनी विचारला. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हीही मेहबूबा मुफ्तींसारख्या संबंध असलेल्यांशी सोबत कसे जाऊ शकता. पुलवामामध्ये 30 किलो आरडीएक्स कोणी ठेवले हे त्या सरकारला माहित नाही, अशी अप्रत्यक्ष टीकाही राऊतांनी भाजपवर केली आहे. भाजप मेहबुबा मुफ्ती सरकार स्थापन करु शकते तर महाविकास आघाडीत मातीतले पक्ष आहेत, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.