मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून सोमवारी सीमाभागात काही मराठी भाषिकांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याविरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावर तुरुंगाबाहेरच वातावरण तुम्हाला मानवत नसल्याची टीका शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. याला संजय राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांची बोलण्याची पद्धत महाराष्ट्र सहन करणार नाही. संजय राऊतांना षंड बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं. आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करुन तुंरुगांबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरच वातावरण तुम्हाला मानवत नाही असं वाटतंय, म्हणून तुम्ही अशी वक्तव्य करताय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं, असा सल्ला देसाईंनी राऊतांना दिला आहे.
तर, चंद्रशेखर बावनकुळेंनीही संजय राऊतांना सुनावले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमची काय भूमिका होती? जेलमध्ये जाऊन सध्या ते कैद्यांकडून काही वाक्य शिकून आले आहेत. संघ, मर्दानगी, रेडे हे शब्द तिथलेच आहेत. महाराष्ट्र हे शब्द ग्रहण करते का? तुम्ही हनुमान चालीसा वाचणाऱ्या महिलेला अडवले. तुम्ही षंड आहात. सामाजिक व राजकीय वातावरण खराब करू नका. वातावरण गढूळ करणे थांबवा नाहीतर भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा बावनकुळेंनी राऊतांना दिला आहे.
संजय राऊतांनी दिले प्रत्युत्तर
संजय राऊत म्हणाले की, शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटक आव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा, न्यायालये, तपास यंत्रणा खिशात आहेत, असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? मी तयार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.v
दरम्यान, महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलयं? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्ली विचारा, हे चालणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.