राजकारण

...म्हणून तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने तुम्हाला झोपवलं ना; देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटवर राऊतांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी 'यही समय हैं, सही समय हैं, सोए हुए को जगाने का' उद्या सकाळी 10.30 वा. असे ट्विट केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

देवेंद्र फडणवीस यांनी 'यही समय हैं, सही समय हैं, सोए हुए को जगाने का' उद्या सकाळी 10.30 वा. असे ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आज सकाळी 10.30 वाजता कोणता गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस करणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कुणीही झोपलेलं नाही, महाराष्ट्र जागाच आहे. महाराष्ट्र हा कधीच झोपलेला नाही. म्हणून तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने तुम्हाला झोपवलं ना.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत महाराष्ट्र जागा आहे, तोपर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदीजी असतील, अमित शाहजी असतील किंवा आपण सगळे लुटारू आहात, तुम्हाला हा देश इंग्रजांप्रमाणे लुटता येणार नाही. आम्ही जागे आहोत महाराष्ट्रात. आम्ही जागे नसतो तर अर्धा महाराष्ट्राचा सातबारा देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने गौतम अदानीच्या नावाने करुन टाकला असता. असे संजय राऊत म्हणाले.

Sachin Dodke EXCLUSIVE | पायाभूत सोयीसुविधा देण्याचा सचिन दोडके यांचा संकल्प, विशेष मुलाखत

Latest Marathi News Updates live: कल्याण शिळफाटा रोडवर निवडणूक भरारी पथकाची कारवाई

Eknath Shinde Speech :त्यांच्या बॅगेत काहीच नाही, त्यांना कंटेनर लागतो | शिंदेंचा ठाकरेंना टोला

Babaji Kale On Dilip Mohite: बाबाजी काळेंनी केला दिलीप मोहितेंवर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर