राजकारण

फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो; राऊतांचा इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी शनिवारी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गटाला) मोठा धक्का बसला आहे. परंतु, गजानन किर्तीकर यांचा मुलगा अद्यापही शिवसेनेत आहे. यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झाला, असे त्यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत. त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याने झाला आहे. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प बाहेर गेल्यावर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातून प्रकल्प जात आहेत. यावर कुणीच काही बोलत नाही. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत? यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेणं गरजेचं आहे. राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे. पण महाराष्ट्र कमजोर झाला, तर आपण राजकारण करायलाही उरणार नाही याचं भान सत्ताधारी आणि विरोधकांनीही ठेवलं पाहिजे, असे सल्ला त्यांनी दिला आहे.

तर, संजय राऊत यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे सूचक विधान केले आहे. महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालं, की उद्धव ठाकरे सांगतायत ते खरं आहे. मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?