मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललयं याची कल्पना शेजऱ्यालाही नसतं. पण, हे अनपेक्षित नव्हतं, असे त्यांनी म्हंटले आहे.
शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राजकीय संन्यास घेतलेला नाही. शरद पवारांसारखे नेते राजकारणातून व समाजकारणातून कधीही निवृत्त होणार नाहीत. हा त्यांचा पक्षातंर्गत विषय असून शिवसेनेने भाष्य करणे योग्य नाही. पण, देशाला आणि राज्याला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि ते देत राहतील, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादीच्या बैठका सुरु असून निर्णय घेतलं जातील. अचानक गोष्टी घडल्या धक्कादायक असल्या तरी हे अनपेक्षित नाही, असं मला वाटलं. हा निर्णय कोणत्या परिस्थितीत का घेतला. हे तेच सांगू शकतील, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
1990 च्या दरम्यान हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता. पक्षातील आणि राज्यातील राजकारणानी त्यांना उबग आला आणि त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु, शिवसैनिकांचा रेटा एवढा होता की काही दिवसांनी त्यांनी राजीनामा मागे घेतला. असे नेते विशिष्ट परिस्थितीत निर्णय घेतात.
त्यांच्या पक्ष गोंधळलेला अवस्थेत आहे. त्यांच्याच पक्ष आधारस्तंभ पदावरुन दूर होतोय. अशात इतर पक्षांनी व्यत्यय आणणे योग्य नाही. ते मोकळे असतील त्यावेळी आम्ही भेट देऊ. शरद पवारांच्या राजीनाम्याचा व या सर्व गोष्टींचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही, असेही राऊतांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे नेतृत्व निर्विवाद शरद पवारच करणात. शिवसेना पक्ष ठाकरे नावावरच चालतो. मिंधेच्या हातात निवडणूक आयोगाने दिला असला तरी जिथे ठाकरे तिथे शिवसेना. त्यांचप्रमाणे जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी, असेही त्यांनी म्हंटले आहे. तर, शरद पवारांच्या निर्णयाची कुणकुण सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार यांनाही नव्हती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललयं याची कल्पना शेजऱ्यालाही नसतं. पण, हे अनपेक्षित नव्हतं, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.