शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज फैसला होणार आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, अपात्रता सुनावणीत चालढकल केली जात आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झालाय. विधानसभा अध्यक्ष 2 वेळा आरोपींना भेटलं. घटनेनुसार शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही. विधानसभाअध्यक्षांनी तटस्थ राहायला हवं. शिंदेंची निवड बेकायदेशीर म्हणजे त्यांचं सरकारही बेकायदेशीर.
तसेच ते पुढे म्हणाले की, दीड वर्षातील प्रत्येक निर्णय घटनाबाह्य. आमदार अपात्रतेच्या निर्णयात मॅच फिक्सिंग झाली आहे. आज घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे. मोदी शुक्रवारी राज्यात येणार याचा अर्थ, सरकार कायम राहणार. नार्वेकर शिंदेंकडे मॅच फिक्सिंग करायला गेले होते. मॅच फिक्सिंग झाल्याने शिंदेंचा दावोस दौरा. असे राऊत म्हणाले.