राजकारण

वाघाचे कातड पांघरून लांडगे निघाले गोरेगावला; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

बंडखोरीनंतर शिंदे गट पहिलाच शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी साजरा करणार आहे. यावरुन संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बंडखोरीनंतर शिंदे गट पहिलाच शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी साजरा करणार आहे. याचा टीझरही त्यांनी प्रदर्शित केला असून वाघ निघाले गोरेगावला, असे पोस्टर्सही लावण्यात आले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. वाघाचे कातड पांघरून लांडगे निघाले गोरेगावला असं त्यांनी करायला पाहिजे, असा निशाणा राऊतांनी शिंदे गटावर साधला आहे.

मिंदे गटाचे काही पोस्टर मी येताना पाहिले. वर्धापन दिनाला वाघ निघाले गोरेगावला, असं त्या पोस्टरवर लिहिलं होतं. त्यांनी एकदा मराठी नीट शिकून घ्यावं. ते वाघाचे कातड पांघरून लांडगे निघाले गोरेगावला, असं त्यांनी करायला पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.

पुढची पक्षाची दिशा ठरवण्यासाठी आज उद्धव ठाकरे हे या ठिकाणी आलेल्या वाघांना मार्गदर्शन करतील. आगामी निवडणुका तर पुढे आहेतच आपण पुढे पक्षाची वाटचाल नेमकी कशी असणार त्याबद्दल आजच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन होईल. आज उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यामुळे दुसरा कुठलाही प्रस्ताव इथे मांडला जाणार नाही ही काय राष्ट्रीय कार्यकारिणी नाही हे एक शिबिर आहे, असेही संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यात 'शिवसेना' नावाची निडर हिंदुत्वाची डरकाळी सबंध हिंदुस्थानात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या मुखातून दुमदुमली, त्याला 57 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या तत्वांशी प्रामाणिक असलेले त्यांचे वाघ, अर्थात कट्टर 'शिवसैनिक' गोरेगावला वर्धापन दिन साजरा करणार आहेत. त्या दिवशी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांचा जागर होणार आहे, असे म्हंटले आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result