देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
शरद पवार उद्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीवर होणारे हल्ले आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांचे उद्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं उचित ठरणार नाही. असे सर्वांचे मत आहे. यामुळे राऊत नाराज असल्याचे कळत आहे
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिका घेऊ नका असे म्हणत संजय राऊतांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष सांगण्यात आले आहे. मोदींच्या पुरस्काराला उपस्थित राहणार असल्यानं ठाकरे गट नाराज खासदार संजय राऊतांनी संकेत दिले आहेत. कार्यक्रमाला हजर राहू नये, राऊतांनी अप्रत्यक्ष मागणी केली आहे.