राजकारण

Sanjay Raut: "वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आमच्यात सहभागी व्हावं"

Published by : Dhanshree Shintre

शाहू महाराज यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने कोल्हापूरमध्ये जाऊन मोठ्या महाराजांना भेटणार आहोत. तिथे सांगली येथे जाऊन वसंत दादा यांना श्रद्धांजली वाहू आणि नंतर मिरजमध्ये जाणार आहोत. आमचे दौरे सुरु आहेत आम्ही थांबणार नाही. निवडणुकीच्या घोषणा होण्याआधी दौरे सुरु आहेत. महाविकास आघाडी सभा होतील त्यानिमित्ताने आम्ही शरद पवार यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्रातील ४८ जागा महाविकास आघाडीला होत्या. वंचितने सोबत यावं, राजू शेट्टी यांनी सोबत यावं अशी इच्छा आहे.यासंदर्भात सकारात्मक चर्चा पण झाली आहे. मोठे महाराज अपक्ष लढणार नाहीत, ते आदरणीय आहेत. म्हणून उद्धवजी भेट घेण्यासाठी जाणार. त्यांचे आशीर्वाद घेऊ असं संजय राऊत म्हणाले.

वंचितने कोडी टाकतात. प्रकाश आंबेडकर यांचा कायम सन्मान करतो आमच्यात लढण्याची हिम्मत आहे. ज्या प्रकारे देशात रोज संविधानाची हत्या होत आहे, मला असं वाटत नाही की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानाची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील. उद्या आम्ही पवार साहेबांसोबत बसलो आहोत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तिथे येणार आहेत आम्ही सगळे असू, आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करु. राजकारणात प्रस्तावावर चर्चा होत असते असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत, ते उत्तम कलाकार आहेत. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे. त्यांच्या मनातील संवेदना आणि खंत मला अधिक माहिती आहेत. मोदी आणि शहा यांचे व्यंगचित्र त्यांनी काढले ते आवडले. त्यात भावना होती, म्हणून टाकले. राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये पुलवामा घटनेचं रहस्य उघडं केलं होतं. त्यात त्यांनी पुलवामा हत्याकांड आधी राष्ट्रीय सल्लागार आणि पाकिस्तान सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली आणि त्या भेटीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं होतं का? असा प्रश्न उपस्थितीत केला होता.

संभाजी नगर मतदार संघात कुठलाही वाद नाही. प्रत्येकाला लढण्याची इच्छा व्यक्त होते. सर्वच मतदार संघात मोठ्या प्रमाणात इच्छुक अनेक आहेत. दानवे यांच्याकडे सर्वात मोठ पद आहे आणि ते सरकारवर तुटून पडत आहेत. आम्ही 25 वर्ष सोबत आहोत. पण आता कोणताही स्वाभिमानी माणूस त्यांच्या सोबत जाणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक घटक इडी आणि सीबीआयला घाबरून सोबत येत नाही असे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News