लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी लोकसभेचं कामकाज चालू असताना प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. या दोघांनी सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी पिवळ्या धुराचा वापर केला. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, जुन्या संसद भवनात इतिहास सोबत असल्यासारखे वाटायचे. अतिरेक्यांना असे मार्ग कळाले तर देशात काही सुरक्षित नाही. सरकारकडे ठोस सुरक्षा व्यवस्था नाही. नवीन संसद भवनात इतिहास दिसून येत नाही. आताची वास्तू संसद भवन वाटत नाही. नवीन संसद अधिक असुरक्षित. देशात महागाई, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. संसदेत शिरलेले तरुण बेरोजगार. सरकार सभा, प्रचार करण्यात व्यस्त आहे. नवी संसद माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे. असे राऊत म्हणाले.
नेमकं संसदेत काय घडलं?
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होते. याच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. त्याच्याकडे स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अचानक धूर सुरु झाला. या दोघांना आता पकडण्यात आलं आहे. यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजतं. पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यात एकजण अमोल शिंदे हा महाराष्ट्र लातूरचा असल्याचे समजते तर नीलम कौर सिंह ही हरियाणातील असल्याची माहिती मिळत आहे.