मुंबई : सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सलीम कुत्ता कुणाच्या सहीने पॅरोलवर बाहेर आला. 2016ला गृहमंत्रीपद कुणाकडे होतं, याचा तपास भाजपने करावे आणि मग आमच्याकडे बोट दाखवा, असाही निशाणा राऊतांनी साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मकाऊचा बावनकुळेचा व्हिडीओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई? हे काही कारण होऊ शकते. कायदा असे काम करतो? बाळासाहेब ठाकरे माझे दैवत, त्यांची शपथ घेऊन सांगतो की त्या व्हिडीओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही. संघ परिवार विशेषतः नागपूर वाल्यांना माहिती आहे की तो व्हिडीओ कसा आला ते? ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती.
व्यंकटेश मोरेंच्या पार्टीला यांना आमंत्रण दिले होते. त्या (कुत्ता) संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा. तो एवढा भयंकर गुन्हेगार होता बॉम्बस्फोटमधला तर त्याला तुरूंगातून कोणी सही करून सोडले. याचा तपास भाजपने करावे आणि मग आमच्याकडे बोट दाखवा, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान,आजही व्यंकटेश नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल तर आपली परंपरा आहे जाण, बसणं चर्चा करणे. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतः कडे बघावं, असा टोला त्यांनी नितेश राणेंना लगावला आहे. व्यंकटेश मोरे बाबत मी काहीही मागणी करणार नाही, मोरेचे फोटो मी दाखवले आत्ता, बडगुजर आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा बुरखा कसा फाटला हे मी दाखवले, असेही राऊत म्हणाले आहेत.