देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने आज १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शरद पवार आज पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी मणिपूर सोडून सगळीकडे जातात. पुण्यात एक अराजकीय कार्यक्रम होतोय. आम्हाला वाटतं मोदींनी मणिपूरला जावं.वाद हा शरद पवारांवर आहे, मोदींवर नाही. पवारांनी जावं की नाही हा वाद आहे. मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मोदींनी आरोप केल्यानंतर सगळे भाजपामध्ये सामील झाले. आरोप केलेले सर्व आज मोदींच्याच सोबत असतील. भाजपाने आरोप खोटं असल्याचे निवेदन द्यावं. भ्रष्टाचाराचा वाद मोदींनी निर्माण केला आहे. व्यासपीठावर जावं की नाही हा पवारांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. असं राऊत म्हणाले.
यासोबतच सामनातून म्हटले आहे की, पुणे भेटीचा ते पुरेपूर राजकीय वापर करून घेतील. कारण कसव्यातील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. पुरस्कार सोहळय़ात श्रीमान शरद पवार खास व्यासपीठावर उपस्थित राहतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. शरद पवारांचे लोक भ्रष्टाचारी व लुटारू आहेत, असे त्यांनी हजारो कोटींचे आकडे देऊन सांगितले. आज टिळक पुरस्कार स्वीकारताना हे सर्व भ्रष्टाचारी वगैरे लोक पुण्यात मोदींच्या मांडीस मांडी लावून बसणार आहेत.असे म्हटले आहे.