मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की,मणिपूरच्या विषयावर मोदी बोलू देत नाही. मोदी भारताच्या संसदेत चर्चा करत नाही. मोदींच्या प्रत्येत कृतीमध्ये राजकीय स्वार्थ असतो. मणिपूर घटनेवर युरोपात चर्चा होते. मणिपूरची कायदा व्यवस्था नीट करा. संसदेत मणिपूर घटनेवर चर्चा का नाही? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.