एमडी ड्रग्ज आणि ससून प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी ताबा घेतला आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, ललित ड्रग्ज प्रकरणात 2 मंत्र्यांचा सहभाग आहे. हे दोन मंत्री शिंदे गटाचे आहेत. ससूनच्या प्रकरणामध्ये जो काही पकडापकडीचा खेळ सुरु आहे. ते नाटक बंद करा. आज एकाला पकडलं उद्या दुसऱ्याला पकडलं. यात दोन कॅबिनेटमधल्या मंत्र्यांचा सहभाग आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, ललित पाटीलला तुरुंगातून ससूनमध्ये आणण्यात आलं. या सर्व गोष्टींचा पोलिसांनी तपास करावा. त्यांच्यापर्यंत पोहचावे. नाहीतर आम्ही नावं घेऊन सांगू शकतो. तिथे SIT स्थापन करा. हे किरकोळ मासे पकडण्यापेक्षा मंत्रिमंडळातील मोठे मासे पकडा. त्यांना हात लावण्याती हिंमत दाखवा. असे संजय राऊत म्हणाले.