फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, खेळामध्ये हार - जीत होत असते. मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला. क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी शिरली. भाजपाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. विश्वचषक आम्हीच जिंकणार अशा थाटात भाजप होता. भारतीय संघ विश्वचषकात उत्तम खेळला. कपिल देव काल सामन्याला आले असते तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागले असते. मुंबई हीच क्रिकेटची पंढरी. मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचं, पैसा घेऊन जायचं, कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायचे आणि क्रिकेट देखील घेऊन जायचंय. असे राऊत म्हणाले.
कपिल देव यांना आमंत्रित केलंच नव्हते. वानखेडेवर सामना असता तर जिंकलो असतो. खेळाडू चांगले खेळूनही पराभूत झाले. ईडी आता ऑस्ट्रेलियात पोहचली असेल. मोदी स्टेडियमवर सामना घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली आहे. वल्लभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले आहे. असे संजय राऊत म्हणाले.