राजकारण

...ही तर मिरच्यांची धुरी; संजय राऊत यांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नागपूरमध्ये जाहीर सभा घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नागपूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस हे एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही. असे म्हणत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, जे कालपर्यंत मुख्यमंत्री होते, बॉस होते. आज त्यांची हालत काय आहे? दोन दोन उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत आहेत. हे मुख्यमंत्री त्यांना ज्युनिअर होते, त्यांच्या हाताखाली आता हे काम करत आहेत. संपूर्ण सरकार दिल्लीतून सुरू आहे. त्यामुळे फ्रस्टेशनमध्ये फडणवीस बोलत आहेत. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर प्रचंड खाली आणला आहे.

तसेच उद्धव ठाकरे बोलले. बाण आरपार घुसला. मिरच्या आरपार घुसल्या. ही मिरच्यांची धुरी आहे. वर्षभरापासून ज्यांनी महाराष्ट्र कलंकित केला त्या कलंक शब्दावर बंदी आहे का? फडणवीस यांना लवकर मिरच्या झोंबतात. हे त्यांचं फ्रस्टेशन आहे. ते उफाळून येत आहे. असे संजय राऊत म्हणाले.

राज्यात विधानसभेसाठी 7 हजार 995 उमेदवारांचे अर्ज दाखल

महायुतीकडून 286 ठिकाणी 289 उमेदवार रिंगणात

Maharashtra Swarajya Party | स्वराज्य पक्षाचे 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात | Lokshahi News

शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप-मनोज जरांगे पाटील यांची भेट

आमदार श्रीनिवास वनगा मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल