राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपाचा कार्यक्रम संपल्यावर रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहे. भाजपाचे रामाशी काही नातं नाही. भाजपा निमंत्रण देणारी कोण आहे? अयोध्येत होणारा कार्यक्रम भाजपाचा, रामलल्लाचा नाही.
तसेच राऊत पुढे म्हणाले की, आम्हाला कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही. एका उद्योगपतीला पूर्ण देश दिला जातोय. अयोध्येचा सातबारा देखील उद्योगपतीला देणार. संसदेचे उद्घाटन झाले तेव्हा देखील हाच प्रकार झाला. आमंत्रणाचे राजकारण देशात कधी झालं नव्हते. असे संजय राऊत म्हणाले.