चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाला. यामधील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कालच्या ईव्हीएम आदेशाचा आम्ही स्वीकार करतो. मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निकालामुळे लोक सदम्यात आहेत. कालच्या निकालानंतर इंडिया आघाडी ताकदीने उभी राहिलं.
तसेच ते पुढे म्हणाले की, भाजपाने 2014मध्ये शिवसेनेची साथ सोडली होती. राहुल गांधींनी तेलंगणात जोरदार प्रचार केला. पुन्हा भाजपाची लाट आली तर गद्दारांचे काय होणार? मोदी आहेत म्हणून भाजपा आहे, मोदी नसतील तर भाजपा काहीच नाही. मध्यप्रदेशातील निकाल धक्कादायक. असे राऊत म्हणाले.