राजकारण

Sanjay Raut: "आनंद दिघेंच्या आश्रमात बार प्रमाणे नाचतात, पैसे उधळतात" संजय राऊत म्हणाले...

या मिंधे सेनेच्या लोकांनी गुंडांनी टार्गेट पोरांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात लेडीज बारमध्ये त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला.

Published by : Dhanshree Shintre

कारवाई पदावरून काढणं खुलासे आणि माफ्या ही सर्व नोटंकी असते. मुळात तुमची संस्कृती आणि विकृती काय आहे राज्य करता म्हणून राजकारणात आहेत. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरांमध्ये ठाण्याच्या तलाव पाळीवर असेल अनेक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमाने महाराष्ट्राला महोत पाडलं. अनेक साहित्यिक कवी लेखक इथे निर्माण झाले, सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले. या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळून दिली असे सुसंस्कृत शहर ठाणे आहे.

या ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले सतीश प्रधान, मो.दा जोशी असतील, धर्मवीर आनंद दिघे यांना तुम्ही आपले गुरु मानत आहात आणि त्यांची जी वास्तू होती त्या वास्तूमधून ते न्याय द्यायचे, दरबार घडवायचे, लोकांना भेटायचे तिथे त्यांचा वास्तव्य होतं. त्या वास्तूमध्ये या मिंधे सेनेच्या लोकांनी गुंडांनी टार्गेट पोरांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात लेडीज बारमध्ये त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला आपण पाहा हे चित्र अत्यंत विचलित करणारा चित्र आहे आणि मी कालही म्हणालो परवाही म्हणालो आनंद दिघे जिथे बसत होते त्या खुर्चीवरती एक हंटर लावलेला असायचा त्या हंटरचा अर्थ असा होता चुकाल तर पाठीवर हंटर पडेल असं आम्ही म्हणायचं आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे असे संजय राऊत म्हणाले.

आनंद दिघे साहेब असतील तर हे जे लेडीज बारवाले होते आतमध्ये घुसलेले मिंधे सेनेची लोक त्यांना आणि त्यांच्या बॉसला चापकाने फोडून काढलं असतं टेंभी नाक्यावर. कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आली एक तर तुम्ही आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक, दहशत या माध्यमातून तो जो पारशांचा ट्रस्ट होता त्यांचा ताबा घेतला मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आनंदी दिघे साहेबांची प्रॉपर्टी आहे. आनंद दिघे म्हणजे तुमचे खाजगी नाही कोणी अशा पद्धतीने ठाण्यातील लोकांची मान खाली जाईल शर्मिने अशा प्रकारचे कृत्य तुम्ही केला आहे. तुमच्या लोकांनी केलं हे तुमची संस्कृती आहे ती खाली आली आहे. मिंधे सेनेचे जे वरचे सरदार आहेत, शिलेदार ही त्यांची संस्कृती आहे ती खाली आली आहे. त्यामुळे आता कोण माफी मागत असेल पदावरून काढला असेल अमुक असेल ही पूर्णपणे नोटंकी आहे असे संजय राऊत म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha