राजकारण

Sanjay Raut : 'या' कारणामुळे संजय राऊत झाले नाराज?

संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा आहे

Published by : Siddhi Naringrekar

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

शरद पवार उद्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीवर होणारे हल्ले आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांचे उद्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं उचित ठरणार नाही. असे सर्वांचे मत आहे. यामुळे राऊत नाराज असल्याचे कळत आहे.

महाविकास आघाडीतील एक गट शरद पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या विरोधात आहेत. शरद पवार गटातील काही नेतेसुद्धा पवारांच्या विरोधात असल्याचे समजते. त्यामुळे आता पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...