राजकारण

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी 'व्हेलेंटाईन डे'ला; संजय राऊत म्हणाले, सर्वकाही प्रेमाने...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. पाच सदस्यीय घटनापीठाकडून ही सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने तारीख दिली असून पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, आमचे घटनेवर प्रेम आहे. 14 फेब्रुवारीपासून घटनापीठ हे सलग सुनावणी घेणार आहे. हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आज मुख्य न्यायधीशांनी महाराष्ट्राचे आम्ही ऐकू, असे सांगितले आहे. 14 फेब्रुवारी रोजी व्हेलेंटाईन डे असून या दिवशी सर्व काही प्रेमाने होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

तत्पुर्वी, सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आले, पैशाचा वारेमाप वापर झाला, पक्षात फुट पाडली आणि खोकेबाज सरकार आले. महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे. खरं म्हणजे हा निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. फेब्रुवारीपर्यंत याबाबत निकाल लागायला पाहिजे, त्यानुसार हे घटनाबाह्य सरकार तेव्हा कोसळेल, असेही राऊतांनी म्हंटले होते.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु