संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे करु शकतात. त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केलं तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल.
शरद पवारांनी काय ठरवले काय ठरवले नाही हे माझ्या इतकं कुणाला माहित नाही. त्या चर्चेच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संजय राऊत होते. माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्यावतीने सुरुवातीची चर्चा शरद पवार साहेब आणि माझ्यातच होत होती. देवेंद्र फडणवीसांनी उगाच नाक खूपसू नये त्यांना काय काहीही माहित नाही. आमचं सरकार बनतंय हे ही त्यांना माहित नव्हते. धक्काच बसला, ते पडता पडता वाचले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे जेव्हा त्यांना समजले त्यांना असे वाटलेलं शिवसेना काय करणार. आपल्या पायाशीच येणार. अशी त्यांची एक भूमिका होती. तसं झालं नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, राजकारण शिवसेनेलाही येतं. देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे. गेल्या अडीच तीन वर्षापासून आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं आहे. असे संजय राऊत म्हणाले.