नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र डागले. 100 आमदार आणि 25 खासदार निवडूण व आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणामध्ये आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे, अशा भाषेत त्यांनी बंडखोरांना सुनावले आहे.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना बाळसाहेब ठाकरे यांनी जन्माला घातली. यामुळे शिवसेना आमचीच आहे. हा वाद असला नकलीचा नसून ईमानदारी आणि बेईमानीचा आहे. आता शिवसेना सोडून गेले आहेत तर सुखाने रहा. कशाला शिवसेनेवे नाव घेत आहेत. कारणे देण्याऐवजी शिवसेना सोडली म्हणून सांगा. उध्दव ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसाला म्हणून सांगा. प्रत्येक दिवशी वेगवेगळी कारणे दिली. एकदा बसा आणि ठरवा कशासाठी बाहेर पडलो. कारणे सांगू नका. स्वार्थासाठी गेला म्हणून सांगा. आम्हाला कारणे माहिती आहे. योग्यवेळी उघड करु, असेही त्यांनी म्हंटले आहे.
ठाकरे सरकारच्या सुरुवातीला कोरोना होता. उध्दव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुखांप्रमाणे राज्याला सांभाळाले. परंतु, शेवटच्या चार महिन्यात उध्दव ठाकरे गंभीर आजारी पडले. त्याच्या आजारपणाचा फायदा घेऊन हे लोक पळून गेले. उध्दव ठाकरे यांच्या सभ्यपणाचा बंडखोरांनी फायदा घेतला, अशी टीका त्यांनी केली आहे. उध्दव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा महिला वर्ग रडत होता. हे पाहून महाराष्ट्रतील महिला वर्ग ढसाढसा रडला. याच अश्रुपुरात 40 आमदार वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत.
भाजपने शिवसेना संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. शिवसेना फोडण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये दिले. ईडीपासून सीबीआयपर्यंत सर्व यंत्रणा वापरल्या. व शेवटी त्यांनी आमदार फोडले. शिवसेनेशिवाय बंडखोर आमदारांनी विधानसभेत निवडून दाखवावे.
मुख्यमंत्री दिल्लीत गेले. त्यांचे हायकमांड दिल्लीला आहे. परंतु, शिवसेनेचा हायकमांड मुंबईत आहे. दिल्लीने सतत महाराष्ट्रावर अन्याय केला. दिल्लीवाल्यांना मुंबई तोडायची आहे. म्हणून आधी शिवसेना तोडली. महाराष्ट्राचा तीन तुकडे करायचे आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.
2014 साली भाजपने युती तोडली. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र निवडणुका लढवून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 2019 मध्ये 64 जागा जिंकल्या. अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले. व चर्चा केली. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यायचे ठरले होते. परंतु, नंतर भाजपने शब्द फिरवला. शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपासला. तेव्हा कोणत्याही बंडखोर आमदाराचा आत्मा जागा झाला नाही. शिवसेनेच्या बाजूने उभे राहीले नाही. तेव्हा हिंदुत्व आठवले आले नाही का? 2019 मध्ये शब्द पाळला असला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले असते, असे त्यांनी सांगितले.
माझ्या मागेही ईडीचा ससेमिरा लावला आहे. पण, संजय राऊत घाबरत नाही. काहीही कारण नसताना माझ्या मुलींना, पत्नीला बोलवत असून छळ करत आहेत. कारण, आम्ही शिवसेनेच्या बाजूने उभे राहिलो. मरण पत्करेल पण शरण जाणार नाही. ज्या शिवसेनेने आम्हाला सर्व काही दिले. त्यांच्याशी आम्ही गद्दारी करणार नाही. मी तुरुगांत जाऊन मरेल पण ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.