राजकारण

...तर आता याच खांद्यावर तुमची तिरडी काढणार; राऊतांचा इशारा

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. टरबूज आज कसब्यात फुटलं म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोलाही लगावला आहे. आमच्या खांद्यावर बसून तुम्ही आला. मात्र, आता याच खांद्यावर तुमची तिरडी काढणार, अशी टीकाही त्यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

ही शिवसेना खोक्याने विकत घेता येणार नाही. हे आज पुण्यात दिसलं. कसबा हा भाजपा बालेकिल्ला म्हणत ही पेठ आमची ती पेठ आमची म्हणत होते. मात्र, आज सर्व पेठा कोसळल्या. कारण इतका दिवस शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही जिंकत होता. आता कोणता मिंधे येणार नाही. आमच्या खांद्यावर बसून तुम्ही आला. मात्र, आता याच खांद्यावर तुमची तिरडी काढणार असल्याचे टीकास्त्र राऊतांनी केला आहे.

तुम्हाला आम्हाला संपवता येणार नाही. आजचा निकाल हा तुमच्या छाताड्यवरच पाहिलं पाऊल आहे. एकनाथ शिंदे सुद्धा हरणार असून ठाणे शिवसेनेच तेथील महापालिकेत ही शिवसेनेचच झेंडा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 2024 साली कळेल राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार? मग बघू कोण ईडी, कोण सीबीआय? मला अटक केली पण येताना मी त्यांना 2024 ला भेटू असे म्हणून मी आलो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

त्याच टिल्लू पोरगं मला धमकी सभेत देत आहे. याची सेक्युरिटी काढा म्हणून पण तुझच सरकार आहे काढ ना. कोकणात शिवसैनिक आले की तू लपून बसला होता. इकडे धैर्यशील याचे नाव धैर्यशील कोणी ठेवले. याच्यात काहीही धैर्य नाही. माझ्यासारखा सभ्य माणूस कोणी नाही. मी 40 जणांना चोर म्हणालं म्हणून चोरांचा अपमान झाल्याचे लोकांनी म्हटले. चोरांचे देखील तत्त्व असते. चोरांचा अपमान झाला म्हणून मी त्यांची माफी मागतो, असा निशाणा राऊतांनी शिंदेंवर साधला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी