राजकारण

Sanjay Raut : सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा करते

संजय राऊतांची बंडखोरांवर टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनंतर खासदारही फुटीच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 12 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरद्वारे टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत यांनी शेरोशायरीमध्ये बंडखोरांवर निशाणा साधला आहे. फन कुचलने का हूनर भीं सिखिए, सांप के खौफ से जंगल नहीं छोडा करते. जय महाराष्ट्र, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे.

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोमवारी रामदास कदम आणि आनंदराव अडसुळ यांच्यासमेत अनेक पक्षनेत्यांवर कारवाई केली. पक्षाविरोधी कारवाईंचे कारण देत त्यांच्यावर हक्कलपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

तर, शिंदे गटाचे 12 खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटून आपला वेगळा गट स्थापन करणार आहेत. राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शिवसेनेचे 12 खासदार हे लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहेत. हे खासदार संसदेत आपला वेगळा गट करण्यासाठीचं पत्रं लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत. तसेच राहुल शेवाळे हे आपले गटनेते आणि भावना गवळी या मुख्यप्रतोद असल्याचं पत्रंही या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्या नवीदिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी