राजकारण

भाजप-मनसेचे राजकारण हे मोघलांच्या जमान्यातील; संजय राऊत म्हणाले, राहुल गांधींसारखी व्यक्ती...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फोन करत प्रकृतीची चौकशी केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राजकारणातील कडवट वातावरणात राहुल गांधींसारखी व्यक्ती राजकीय मतभेद असतानाही मैत्रीचे नाते कायम ठेवतात ही खूप मोठी गोष्ट आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. तर याच वरुन भाजप व मनसेला टोलाही लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींनी आधीही चौकशी केली होती. कालही त्यांनी फोन करुन प्रकृतीची विचारपूस केली. अत्यंत प्रेमाने त्यांनी चौकशी केली. सध्या राजकारणात जो कडवटपणा आला आहे. अशात मित्रही पळून जातात. परंतु, याही वातावरणात राहुल गांधींसारखी व्यक्ती राजकीय मतभेद असतानाही मैत्रीचे नाते कायम ठेवतात ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि यासाठी देशभरातून भारत जोडो यात्रेला समर्थन मिळत आहे. प्रेमाने देश जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व पक्षात आमचे मित्र आहेत. परंतु, एका खोट्या प्रकरणामध्ये अडकवून आपल्या एका राजकारणातील सहकाऱ्याला तुरुंगात टाकले. यानंतर त्यांच्या घरची काय परिस्थिती असेल. त्यांच्या प्रकृतीची काय परिस्थिती असेल. त्यांची किती लोकांनी चौकशी केली हे आपल्याला माहिती आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांनी चौकशी केली. परंतु, आमचे मित्र भाजपातही आहे. मनसेसोबतही एकेकाळी सहकारी होते. परंतु, मी जेलमध्ये गेल्यावर ते आनंदी झाले. याला राजकारण म्हणत नाही. तर ही मोघलांच्या जमानाची राजनीती झाली, असा टोला भाजप आणि मनसेला राऊतांनी लगावला आहे. अशा वेळेला राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्व राजकीय मतभेद असतानाही त्यांनी माझी चौकशी केली. यात प्रियंका गांधीही होत्या. ही आपल्या राजकारणाची परंपरा आहे, असे कौतुक त्यांनी केले आहे.

आम्ही राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन अथवा बचाव करत नाही. शिवाजी महाराजांबाबतीत दुसरे कोणी बोलले असते तर एवढा थटथयाट केला असता. पण, आज तुमचे राज्यपाल व प्रवक्ते सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्ये करतात. आणि तुम्ही बचाव करता याचा अर्थ तुमचे छत्रपती महाराज आणि महाराष्ट्रासंदर्भातील प्रेम हे खरे नाही. महाराष्ट्राची जनता त्यांना माफी मागायला लावेल, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...