मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमदारांनंतर आता शिवसेना खासदारांना घेऊन एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. यासाठी आज ते दिल्ली दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकेची तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नव्हे तर भाजपचे (BJP) मुख्यमंत्री, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, राज्यतील खासदारांच्या घरावर अचानक पोलीस सिक्युरीटी लागली आहे. त्यांना फोडण्यासाठी पोलीस बळ, केंद्रीय यंत्रणा, पैशांचा वापर व ब्लॅकमेलिंगचा वापर होत आहे, अशा आरोप त्यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीशी सामाना करायला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत. ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना मंत्रिमंडळ तयार करायचे आहेत. यासाठी दिल्लीत आले असतील. त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी कधीही दिल्लीत गेले नाही.
शिंदे- फडणवीस सरकाच्या भविष्याचा उद्या फैसला आहे. या अस्वस्थेतून ते दिल्लीत आले असावे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे भाजप नेत्यांना भेटत आहे. न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयन्त केला जात आहे. परंतु, आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात आजही न्यायशास्त्री बाण्याचे काही न्यायमुर्ती आहे. आणि त्यांच्याकडून सेवाच घडेल. त्यांच्याकडून लोकशाहीती खून हाणार नाही. ही खात्री आहे, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात पुराची स्थिती गंभीर असून हाहाकार माजला आहे. अशात मुख्यमंत्री दिल्लीत राजकीय कारणांसाठी निवडणूक सदन व शिवेसना खासदारांची बैठक घेणार आहेत. फुटीरांना प्रोत्साहन देणारे दिल्लीत असतील तर असे होणारच. आज तुम्हाला गुदगुदल्या होत आहेत उद्या हेच शिवसेनेला फोडण्याचे पाप तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, असेही त्यांनी भाजप आणि शिंदे यांना सुनावले आहे.
शिवसेनेचे चिन्ह शिंदे गट घेणार यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, चिन्हाची अथवा पक्षाची कोणतीही लढाई आम्ही लढण्यास तयार आहे. ज्यापध्दतीने छुपे वार करत आहे. भाजपचे मोठे नेते जाहिरपणे महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, असे सांगतात. त्यासाठी आधी शिवसेनेला तोडाण्याचे काम सुरु आहे. परंतु, शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेले खासदार किंवा आमदार आज जरी पाठीत खंजीर खूपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, कारण खासदार आणि आमदार एवढीच शिवसेना नाही. शिवसेना यातून पुन्हा उभी राहील. आज ज्यांच्या घराबाहेर पोलीस आहेत. त्यांचे सभागृहात परत येणे कठीण करु, अशा इशाराच त्यांनी बंडखोरांना दिला आहे.
परंतु, काही खासदार पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे . त्यांनाही माहिती आहे की, उध्दव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून अनेक संकटातून वैयक्तिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व संकटातून सोडवण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले. तरीही ते निघाले.
शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्ट आणि सामना ही ठाकरे ट्रस्टची संपत्ती आहे. उद्या म्हणतील मातोश्रीत जातो. मातोश्रीत आमची आहे. आम्ही मातोश्रीवरही कब्जा करु. सत्तेची, बेईमानीची भांग प्यायली माणसे काही करु शकतात. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनच केली नाही. बाळासाहेब आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. अशा प्रकारची त्यांची वक्तव्ये आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजासहजी शरण जाणार नाही, असेही संजय राऊतांनी सांगितले आहे.