राजकारण

नाकासमोरून पळवलेले उद्योग आधी घेऊन या; राऊतांची मुख्यमंत्र्यावर टीका

दावोस येथे 'वर्ल्ड इकॉनिमिक फोरम'ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दावोस येथे 'वर्ल्ड इकॉनिमिक फोरम'ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले. या परिषदेत 20 उद्योगांसोबत 1 लाख 40 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. दोन लाख कोटींची गुंतवणूक तुमच्या नाकासमोरून गुजरात व इतर राज्य घेऊन गेले. ते आधी परत आणा, असे त्यांनी म्हंटले आहे.

याआधी दावोस मधून काय येत होते आम्हाला माहित नाही. पण, तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून घेऊन नेले. ते आधी परत आणा. दोन लाख कोटींची गुंतवणूक तुमच्या नाकासमोरून गुजरात व इतर राज्य घेऊन गेले. ते आधी आणली तर तुमच्या दावोसला जाण्याचा अर्थ आहे. जगभरातून राज्यकर्ते त्या ठिकाणी येत असतात. मग, त्या ठिकाणी झालेल्या करार इथे येऊन सांगतात. याआधी अनेक लोक गेलेत दावोसला गेले. पण, त्यांनी काय केलं हे सांगितलं नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

इकबाल चहल यांच्या चौकशीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यांच्या हातात सत्ता आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून खोट्या योजना आणि खोट्या चौकशी लावून बदनामीच्या मोहिमा राबवणे सुरू आहे. कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशसारखे गंगेमध्ये प्रेत वाहिली नाहीत. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये चांगला लढा दिला, सुविधा दिल्या व आरोग्य यंत्रणा बळकट ठेवली. नाहीतर मुंबईला मिठी नदीमध्ये प्रेत दिसली असती.

त्यावेळी जे लवकरात लवकर निर्णय घ्यायचे होते ते घेतलेले आहेत आणि ते त्या कायद्यानुसार झालेले आहे. अत्यंत पारदर्शक व्यवहार हे त्यावेळी झालेले आहेत. त्यावेळी गुजरातमध्ये स्मशानात जागा मिळत नव्हत्या आणि उत्तर प्रदेश मध्ये नद्या गंगेतून लाखो प्रेत वाहत होती. भारतीय जनता पार्टीने आमचा आभार मानले पाहिजेत की त्यांनी ज्या पद्धतीमध्ये नेतृत्व केलेला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचे प्राण वाचलेले आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमधील सगळे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात झालेले आहे. महापालिकामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. तेव्हा हे सर्व प्रकल्प झालेले आहेत. व आता हे सरकार पंतप्रधान यांना बोलवून उद्घाटन करत आहेत व त्याचे श्रेय घेत आहेत. महाराष्ट्रातील आत्ताचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचे काम करत आहे, असा घणाघात त्यांनी केली आहे.

शिंदेंचे सहकारी अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा

'राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील' सुषमा अंधारे अस का म्हणाल्या?

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केलं तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल

Influencer इम्शा रहमानचा MMS व्हिडिओ ऑनलाइन लीक, कोण आहे इम्शा?

Mega Block: मुंबईत 16-17 नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळा