राजकारण

Sanjay Raut : पैसे अन् केंद्रीय यंत्रणेच्या बळावर शिवसेनेला हायजॅक करू शकत नाही

संजय राऊतांचा शिंदे सरकारवर टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे सरकारने (Shinde Government) सोमवारी विश्वासदर्शक प्रस्ताव बहुमताने जिंकला. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पैशांच्या आणि केंद्रीय यंत्रणेच्या बळावर पार्टीला हायजॅक करता येणार नाही, असा निशाणाही त्यांनी भाजपवर (BJP) साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, जे हे लोक म्हणत आहे चार लोकांमुळे बंडखोरी केली. त्या 4 लोकांमुळेच तुम्हाला सत्ता मिळाली आहे. ते चार लोक पक्षाचेच काम करत होते. अडीच वर्षे तुम्ही सत्तेत राहिला तेव्हाही हे चार लोक पक्षाचे निष्ठावान म्हणून काम करत होते.

तर, उध्दव ठाकरे हे काही दुधखुळे नसून बाळासहेबांचेच पुत्र आहेत ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणाऱ्यांना केवळ बहाणा हवा असतो. तुम्ही गेले आता बहाणे सांगू नका मंत्री झालेत आता कामे करा, असा सल्लाच त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभागृहातील भाषणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी दिल्लीत असून प्रवासात होतो. मी भाषण ऐकल नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी राज्याची भूमिका न मांडता पक्ष का सोडला हे सांगत होतो. नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनीही पक्ष सोडला त्यावेळी असेच भाषणे केली होती.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून 200 जणांना निवडून आणू, असा दावा केला होता. यावर संजय राऊत म्हणाले, 200 जागा जिंकण्याची भाषा दिल्लीवाले करत आहे. पण, मुख्यमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी घेतली तर आनंदच आहे. परंतु, शिवसेना म्हणून 100 पेक्षा अधिक उमेदतवारांना आम्ही निवडून आणू. काहींनी साथ सोडली म्हणून मोठा वर्ग गेला असे होत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

आताही मध्यावधी निवडून गेतल्या तरी शंभरपेक्षा अधिक जागा जिंकू. ही बाळासहेबांची शिवसेना आहे ती कोणीही हायजॅक करु शकत नाही. पैशांच्या बळावर आणि केंद्रीय यंत्रणेच्या बळावर पार्टीला हायजॅक करता येणार नाही, अशीही टीका त्यांनी केली आहे.

याशिवाय आदल्या दिवशी रडत होते ते काल शिंदे गटात सहभागी झाले त्यांचे आश्चर्य वाटले. अशा लोकांना मतदार उभे करणार नाही. त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार, असा सवालच राऊतांनी विचारला होता. दरम्यान, शिवसेना फुट पडली असतांना आमदार संतोष बांगर यांनी भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतांना त्यांना रडूही कोसळले होते. आता ते शिंदे गटात दाखल झाले आहे. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी