राजकारण

भाजपच्या या मोठ्या नेत्याला संपवण्याचे षडयंत्र; संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली. यासोबत 400 पारचा नारा देखील यावेळी भाजपकडून देण्यात येत आहे. त्यातच भाजपने आता लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Published by : Sagar Pradhan

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली. यासोबत 400 पारचा नारा देखील यावेळी भाजपकडून देण्यात येत आहे. त्यातच भाजपने आता लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान मोदींसह अनेक मोठ्या नेत्यांचे नाव जाहीर करण्यात आली आहे. परंतु, या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्यामुळे विरोधकांनी भाजपला चांगलंच घेरलं आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नितीन गडकरी दिल्लीत असू नये म्हणून त्यांचा पत्ता आतापासूनच कट करण्याचा हे षडयंत्र आहे, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत नितीन गडकरी यांचे नाव नसल्यामुळे विरोधक भाजपविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे. यावरच बोलत असताना संजय राऊतांनी जोरदार घणाघात केला आहे. नितीन गडकरी दिल्लीत असूनही म्हणून त्यांचा पत्ता आतापासूनच कट करण्याचा हे षडयंत्र आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घातला. 4 दिवसांपूर्वी गडकरी शेतकऱ्यांबाबत स्पष्ट बोलले होते. मजूर आणि कष्टकरी हा दुःखी आहे. समाधानी नाही. कोणत्या मंत्र्याची स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का, असा सवाल त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांना विचारला.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश