sanjay pawar sanjay raut Team Lokshahi
राजकारण

संजय राऊत आणि पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्री, शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे (shivsena) संजय राऊत (sanjay raut) आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay pawar) या दोन्ही उमेदवारांनी आज विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) उपस्थित होते.

संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर असून शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. परंतु, ही शिवसेनेची खेळी असून संभाजीराजेंवर दबाव तंत्राचा प्रयोग करत असल्याची चर्चा संपूर्ण राज्यभर होती. परंतु, संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम होते. आज अखेर दुपारी 1 वाजता संजय राऊत आणि संजय पवार यांनी शिवसेनेच्या कोट्यातून अर्ज भरला आहे. यावेळी उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह शिवेसनेचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊतांनी दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती माघार घेणार आहेत. संभाजी राजे भोसले हे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरणार नसल्याची माहिती लोकशाहीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्याने नाराज समर्थक आणि राजकीय नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेनेवर सातत्याने करण्यात येत होता. यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही संभाजी राजेंना आमची ४२ मते द्यायला तयार होतो. यात कोणता विश्वासघात केला. राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेची आहे, अपक्षांची नाही. यासाठी लागणारी मतेही शिवसेनेची आहेत, अपक्षाची नाहीत. तर आमची ४२ मते अपक्ष उमेदवाराला कसे देणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी