बारामती : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आज बारामती दौऱ्यावर होते. बारामती दौऱ्यामध्ये त्यांनी बारामतीमधील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाला भेट दिली आणि या महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता नांदेड दुर्घटनेप्रकरणी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. यावेळी गायकवाड यांनी राऊतांवर निशाणा साधत संजय राऊत ही एक पागल केस आहे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचे आहे, असे वक्तव्य केले आहे.
जेव्हा एखाद्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण दगावतो, यात काही आजार असतो. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या काळात कोरोना आला त्यावेळी या काळात जेवढे लोक मेले या गोष्टीला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत का? तेव्हा त्यांनी राजीनामा द्यायचा होता. या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळी यंत्रणा काम करत असते.
जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एखाद्या डॉक्टरांना सस्पेंड करता येत नाही. जर डॉक्टरांवर अशी कारवाई केली तर उद्या कोणतेही डॉक्टर सेवा द्यायला तयार होणार नाहीत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात. संजय राऊत हा उतावळा प्राणी आहे. याला काय अक्कल नावाची गोष्ट राहिलेली नाही, असे म्हणत संजय गायकवाडांनी राउतांवर निशाणा साधला.