जेव्हा अयोध्येमध्ये आंदोलन चालू होतं तेव्हा हे डरपोक लोकं कुठे होते? मोदीजी कुठे होते? अमित शाह कुठे होते? मैदानात तर आम्हीच होतो ना. आमची शिवसेना होती. ही कोणती लपलेली गोष्ट नाही. अमित शाहाजींची जी ही शेवटची फडफड चालू आहे 4 जूननंतर त्यांना 5 वर्षात जे कांड केले आहेत देशात त्यांची उत्तर द्यावी लागतील अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली.
देशामध्ये काँग्रेसचं राज्य असताना शिवसेनेच्या आंदोलनात होतात तुम्ही. बाबरी मस्जित पाडल्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते आणि स्वःत अमित शाह पक्षाचे नेते सुंदरशेख भंडारी यांनी जाहीर केलं की अयोध्येच्या त्या घटनेशी भारतीय जनता पक्षाचा संबंध नसून शिवसेनेने हे कृत्य केलेलं असेल. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्भयपणे सांगितलं होय जर ते कृत्य शिवसैनिकाने केले असेल तर मला अशा शिवसैनिकाचा अभिमान आहे. तेव्हा अमित शाह कुठे होते? राजकारणात तरी होते का? किंवा अयोध्येच्या त्या मैदानात होते का? मुद्राकांड करण्याइतकं ते अयोध्या कांड एवढं सोपं नसतं असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
जसं नरेंद्र मोदी हे आता बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागले आहेत, पाकिटमारी करायला लागले आहेत ही भाजपची भूमिका आहे का खरं म्हणजे काँग्रेसच्या राज्यात नाही मोदीच्या राज्यात बायकांची मंगळसूत्र ही गहाण पडत आहेत, लुटली जात आहेत. जो माणूस स्वतःच्या घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्रांचे उठाठेव करु नये या देशामध्ये. या देशातील महिलांचे मंगळसूत्र ही का विकली गेली का लुटली गेली नरेंद्र मोदींनी जी नोटबंदी आणली त्या नोटबंदीमुळे लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून घरं चालवावं लागलं. नरेंद्र मोदींनी जे लॉकडाऊन केलं हजारोंचा रोजगार गेला. त्या काळामध्ये लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावं लागलं. जम्मू कश्मीरमध्ये अनेक कश्मीरी पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्र ही मोदी पूरस्तृत भाजप पूरस्तृत दहशतवाद्यांकडून त्यांचं बलिदान झालेलं आहे. मणिपूरमध्ये किती महिलांचे मंगळसूत्र गेली, त्याला जबाबदार मोदी आहेत. किती मंगळसूत्रांचे प्रतिष्ठा मोदींनी ठेवली. या देशामध्ये महिलांच्या मंगळसूत्रावर गंडांतर आला असेल तर तो नरेंद्र मोदींमुळे आला अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
साखर कारखान्यांना निवडणुकीच्या आधी दिलेला निधी म्हणजे लाच असल्याचा आरोप त्यांनी केला. ही लाच आहे. साखरकारखान्यांना अशा पद्धतीने निवडणूकीच्या आधी हजारो कोटीचा मलिदा देणं ही निवडणूकीसाठी दिलेली लाच आहे हा भ्रष्टाचार आहे. मतं विरत घेण्यासाठी त्या त्या भागात दिलेली हा सरकारी निधी आहे. आता कुठे आहे निवडणूक आयोग, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.