MNS Leader Sandeep Deshpande Team Lokshahi
राजकारण

मनसे-भाजप युती होणार? संदीप देशपांडे म्हणाले…

Published by : Vikrant Shinde

मनसेच्या गुढीपाडवा (MNS Gudhi Padwa Melawa) मेळाव्यानंतर राजकीय महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) अक्षरश: ढवळून निघालं आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे, राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांनी मेळाव्यातील भाषणादरम्यान महाविकास आघाडीचा (MVA Goverment) खरमरीत शब्दांत घेतलेला समाचार व भाजपवर (BJP) टीका करण्यासाठी अवाक्षर न काढणं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे वरीष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (BJP Leader Nitin Gadkari) हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे आता आगामी निवडणूकांमध्ये भाजप- मनसेची युती (MNS-BJP Alliance) पाहायला मिळणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

युतीच्या शक्यतेवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रीया:
"कालची भेट वैयक्तिक भेट होती. आतातरी भाजप-मनसे युतीची चर्चा नाही. परंतु शिवसेनेनं भाजप बरोबर युती केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणुक लढली आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. राष्ट्रवादीनं 2 दिवसाचं भाजपसोबत सरकारं स्थापन केलं. एवढा व्याभिचार केला आणि आमच्या केवळ अफवा उठल्या तरी यांना झोंबतात." असं मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती