राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु असताना दुसरीकडे राजकीय मंडळींकडून मागील काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले. त्यामुळे तेपुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आव्हाडांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून आव्हाडांच्या या विधानाचा जोरदार निषेध नोंदवला आत आहे. याच विधानावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देत आव्हाडांवर टीका केली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
आव्हाडांच्या विधानावर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून भाष्य केले आहे ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील. असा सूचक इशारा त्यांनी यावेळी आव्हाडांना दिला आहे.
आव्हाडांनी आधीच दिले होते स्पष्टीकरण?
आव्हाडांच्या विधानाचा भाजपकडून जोरदार निषेध नोंदवला जात आहे. त्यातच याच वादावर भाष्य करताना आव्हाड म्हणाले की, मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकान समोर मांडले. तुम्ही बदनामी करा बहुजन महापुरुषांची आम्ही देऊ उत्तर. बहुजन इतिहास का डोळ्यात सलतो. असे म्हणत त्यांनी #करारा_जवाब _मिलेगा #जयशिवराय _जयभीमराय असे स्पष्टीकरण आव्हाडांनी केले होते.