Sambhaji Raje  team lokshahi
राजकारण

Sambhaji Raje खासदारकीच्या निवडणुकीतून माघार घेणार?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने (Shivsena) पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) माघार घेणार आहेत. संभाजी राजे भोसले हे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरणार नसल्याची माहिती लोकशाहीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजे यांच्यापुढे पक्षप्रवेशाची अट ठेवली होती. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला असून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडीनंतर संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे. तसेच, अर्ज भरला तरी विजयाची हमी नसल्याने अखेर संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. तर आता आधी संपूर्ण राज्यभर संघटना बळकट करणार आणि नंतर निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि संजय पवार हे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्रालयात उपस्थित राहिले आहेत. तर संभाजीराजे छत्रपती यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचे आहे. मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे. यामुळे त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल