काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतला. त्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आज सतेज पाटील यांनी इंडिया आघाडीची बैठक घेतली.
या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मी वैयक्तिक या विषयावर टीका टिपण्णी करणार नाही. काल माझं जे स्टेटमेंट होते तेच आहे त्यानंतर मी काल संध्याकाळी जे बोललेलो आहे की, याच्यावर वैयक्तिक टीका टिपण्णी किंवा कुठलीही माझ्याकडून शब्द त्याठिकाणी येणार नाही. आता घटना घडलेली आहे. आता त्याच्यावर बोलून नवीन वाद निर्माण मी करणार नाही आहे. मला आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. गादीचा सन्मान ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका राहिलेली आहे आणि पुढेसुद्धा राहणार आहे. असे सतेज पाटील म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज छत्रपती घराण्याचे प्रमुख आहेत. छत्रपती शाहू महाराज जे काही बोलतील ते आम्हाला सगळ्यांना लागू असते. छत्रपती शाहू महाराज याबाबतीत सविस्तर बोललेलं आहेत. पुढेसुद्धा काही बोलायचं असेल तर सविस्तरपणे तेच सांगू शकतात. तेच बोलतील. त्यांचा अधिकार आहे तो. म्हणून मी त्याच्यावर बोलणं उचित नाही. छत्रपती शाहू महाराज जे सांगतील त्याप्रमाणे आम्हाला ते लागू होते. असे त्यांनी म्हटले आहे.